
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नव्या इन्कम टॅक्स अॅक्ट 2025 ला मंजुरी दिली आहे. हा नवीन कायदा 1 एप्रिल 2026 पासून लागू करण्यात येणार आहे. टॅक्स कायद्याला सहज आणि आधुनिक बनवण्यासाठी केंद्र सरकारने नवीन टॅक्स कायदा आणण्याचे ठरवले आहे. या नव्या कायद्यामुळे टॅक्स दरात कोणताही बदल होणार नाही, असेही सरकारकडून सांगण्यात आले. परंतु, सरकारने काही बदल केले असून या बदलानुसार, आता नव्या कायद्यानुसार आता क्रिप्टोच्या संपत्तीलासुद्धा अनडिस्क्लोज्ड इन्कम (अघोषित संपत्ती) मानले जाईल. याआधी यामध्ये केवळ रोख रक्कम, सोने, चांदी आणि दागिन्यांचा समावेश होता.
12 ऑगस्ट रोजी संसदेत या विधेयकाला पास केले होते. नवीन कायदा आल्यानंतर काय बदल होतील, हे पाहणे गरजेचे आहेत. जुन्या कायद्यात 819 कलम आणि 47 अध्याय होते. तर नवीन कायद्यात केवळ 536 कलम आणि 23 अध्याय आहेत. याचाच अर्थ शब्दांची संख्या 5.12 लाखावरून कमी करून 2.6 लाख करण्यात आली आहे. पहिल्यांदा 39 नवीन टेबल्स आणि 40 नवीन फॉर्म्युलाचा समावेश करण्यात आला आहे. जुन्या आणि अनावश्यक कलमांना हटवण्यात आले आहे. जे कायदे आहेत ते आधीच्या तुलनेत जास्त व्यवहारिक बनवण्यात आले आहेत. विधेयकाची पानेसुद्धा 823 वरून 622 करण्यात आली आहेत.
असेसमेंट ईयरच्या जागी आता टॅक्स ईयर
असेसमेंट ईयरच्या जागी आता टॅक्स ईयर या शब्दांचा वापर करण्यात येईल. आता जर कोणी डेडलाईननंतर रिटर्न फाईल करत असेल तर त्याला टीडीएस रिफंड क्लेम करण्याची परवानगी मिळणार आहे. नव्या कायद्यानुसार आता क्रिप्टोच्या संपत्तीलासुद्धा अनडिस्क्लोज्ड इन्कम (अघोषित संपत्ती) मानले जाईल. याआधी यामध्ये केवळ रोख रक्कम, सोने, चांदी आणि दागिन्यांचा समावेश होता.