
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेला आणि नवसाला पावणाऱ्या ‘लालबागचा राजा’वर पहिल्याच दिवशी भाविकांनी सोन्या-चांदीची उधळण केली. एका भाविकाने दोन लाखांचा सोन्याचा मोदक तर एका परदेशी भाविकाने अमेरिकन डॉलर्सचा हार अर्पण केला.
गणेश चतुर्थीच्या पहिल्याच दिवसापासून लाखो भाविकांच्या गर्दीने लालबागचा परिसर फुलून गेला आहे. ‘लालबागचा राजा’च्या दर्शनासाठी मुंबई आणि महाराष्ट्रासह देशभरातील भाविक येत असतात. पहिल्याच दिवसापासून लाडक्या ‘राजा’च्या दर्शनासाठी भाविकांची लांबच लांब रांग लागत आहे. भाविक मोठय़ा श्रद्धेने ‘लालबागच्या राजा’ला सोन्या-चांदीच्या विविध वस्तू अर्पण करत आहेत. याशिवाय हुंडीमध्ये पैसेही मोठय़ा प्रमाणात अर्पण करत आहेत.
बाप्पाचरणी अर्पण…
सोन्याच्या वस्तू – सुवर्णपाऊल, हार, मुकुट, अंगठी, नाणे, गणपतीची मूर्ती आणि दोन लाखाचा सोन्याचा मोदक
चांदीच्या वस्तू – एक किलो चांदीची वीट, मोदक, गणपती, मुकुट, हार, पाळणा, समई, फुले, चांदीचे घर