पंजाबच्या पुरात 29 जणांचा मृत्यू

अतिवृष्टीमुळे आलेल्या महापुरात आणि भूस्खलनाच्या घटनांमध्ये पंजाबमध्ये 29 जणांचा मृत्यू झाला. या नैसर्गिक आपत्तीचा 2.56 लाख लोकांना फटका बसल्याचे अधिकाऱयांनी सांगितले. 23 पैकी 12 जिह्यांना महापुराचा वेढा बसला. गेल्या दहा वर्षांत इतकी भीषण परिस्थिती पहिल्यांदाच उद्भवल्याचे त्यांनी सांगितले.