
रस्त्याने प्रवास करणाऱ्या दुचाकी आणि चारचाकी वाहनधारकांकडून कागदपत्रांच्या नावाखाली ‘चिरीमिरी’ घेणाऱ्या प्रोग्रॅममधील पोलीस कर्मचाऱ्याने हद्दच केली. हिंदुस्थान बघण्यासाठी आलेल्या जपानच्या एका पर्यटकाकडून एक हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी झोन ऑफिसर, एक पोलीस कर्मचारी आणि एका होमगार्डला डीसीपी डॉ. राजेश मोहन यांनी निलंबित केले आहे.
जपानी नागरिक केल्टो यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट शेअर केला. त्यात त्यांनी लिहिले, ‘व्वा! गुरुग्राम पोलिसांनी जपानी पर्यटकाकडून १ हजार रुपयांची लाच घेतली. या अशा पोलिसांमुळे हिंदुस्थानची प्रतिमा खराब होते.’
हा व्हिडीओ व्हायरल होताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची गंभीर दखल घेतली. डीसीपी ट्रॅफिक डॉ. राजेश मोहन यांनी तातडीने कारवाई करीत यात सहभागी असलेल्या तिघांनाही निलंबित केले. यामध्ये झेडओ ईएसआय करण सिंह, हवालदार शुभम आणि होमगार्ड भूपेंद्र यांचा समावेश आहे. या घटनेची सखोल चौकशी केली जात आहे.
View this post on Instagram




























































