
सरकारी वकील मानकुंवर मिलिंद देशमुख (जाधव) यांची मुंबई उच्च न्यायालय व कोल्हापूर सर्किट बेंचच्या प्रभारी मुख्य सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून त्या वकिली करत आहेत. विविध फौजदारी प्रकरणात त्यांनी सरकारची व पोलिसांची बाजू भक्कमपणे मांडली आहे. पोलीस ठाण्यात व कारागृहात सीसीटीव्ही बसवण्याच्या मुद्दय़ावर न्यायालयाने त्यांच्या कामगिरीचे कौतुकही केले आहे.





























































