गोव्यातील बिट्स पिलानी कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळला, दहा महिन्यात पाच जणांचे मृत्यू

गोव्यातील बिट्स पिलानी कॉलेजच्या कॅम्पसमध्ये एक विद्यार्थी मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. रिषी नायर असे त्या तरुणाचे नाव असून तो हॉस्टेलच्या रुममध्ये मृतावस्थेत आढळला. गेल्या दहा महिन्यात अशा प्रकारची ही पाचवी घटना आहे.

”रिशी नायर हा विद्यार्थी रात्री साडे दहाच्या सुमारास त्याच्या हॉस्टेलच्या खोलीत मृतावस्थेत आढळला. तो कुणाचेही फोन उचलत नसल्याने हॉस्टेलच्या प्रसासनाने दरवाजा तोडला. त्यावेळी रिशी नायर बेडवर बेशुद्धावस्थेत सापडला. त्याला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले”, असे पोलिसांनी सांगितले.

याआधी डिसेंबर 2024 ला ओम प्रिया सिंग, मार्च 2025 ला अथर्व देसाई, मे 2025 ला कृष्णा कसेरा, ऑगस्ट 2025 ला कुशाग्रा जैन हे विद्यार्थी त्यांच्या हॉस्टेल रुममध्ये मृतावस्थेत आढळले होते. या प्रकरणांच्या चौकशीसाठी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी एक समिती नेमली आहे.