सामाजिक, सांस्कृतिक बांधिलकीचा वसा, विलेपार्ले जुहू गणेश मंडळाचा विद्यार्थ्यांना मदतीचा हात, शैक्षणिक साहित्याचे वाटप

सामाजिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रीय ऐक्याच्या संकल्पनेला गणेशोत्सवाच्या माध्यमातून पुढे नेण्यासाठी विलेपार्ले-जुहू सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदाही पुढाकार घेतला मंडळाच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच रोख मदत करण्यात आली.

विलेपार्ले-जुहू सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची सुरुवात शिवसेना संघटक संजय मानाजी कदम यांनी केली असून मंडळामार्फत दरवर्षी हजारो विद्यार्थ्यांना मोफत टॅब, शैक्षणिक साहित्य वाटप केले जाते या वर्षी देखील मंडळाच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप तसेच गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी 5 हजार रुपये देण्यात आले. शिवसेना उपनेते, विभागप्रमुख अनिल परब यांच्या हस्ते या धनादेशाचे वाटप करण्यात आले. विविध क्षेत्रातील मान्यवरानी भेट देत गणरायाचे दर्शन घेतले.

चर्मोद्योग कामगार सेना अध्यक्ष व युवासेना सहसचिव मयुर कांबळे यांच्या वतीने गणेशभक्तांना मोफत कोल्ड्रिंक व आइस्क्रीम वाटप करण्यात आले. या उपक्रमावेळी महिला विभाग संघटिका श्रद्धा जाधव, उर्मिला पांचाळ, सुनिता अहिरे, पवन जाधव, हमीद शेख, सरिता मांजरे उपस्थित होते.

शिवसेना शाखा क्र. 192 व माजी नगरसेविका प्रीती पाटणकर यांच्या वतीने गणेश भक्तांसाठी अल्पोपहार व पाणी वाटप करण्यात आले. या उपक्रमावेळी शिवसेना नेते दिवाकर रावते, माजी नगरसेवक प्रकाश पाटणकर, विभागप्रमुख आमदार महेश सावंत, महिला विभाग संघटक श्रद्धा जाधव, विधानसभा संघटक आरती किनरे, विधानसभा निरीक्षक यशवंत विचले, युवासेना विभाग अधिकारी स्वप्निल सूर्यवंशी, तेजश्री सुर्वे, उपविभाग प्रमुख सिद्धार्थ चव्हाण, शाखाप्रमुख प्रविण नरे, शाखा संघटक रीमा पारकर, कार्यालय प्रमुख रमेश सोडये, तसेच शिवसैनिक व युवासेना मोठया संख्येने उपस्थित होते.