चीनच्या शिनजियांगमध्ये भूकंपाचे झटके

चीनच्या शिनजियांग प्रांतात सोमवारी भूकंपाचे जोरदार झटके जाणवले. या भूकंपाची रिश्टर स्केल तीव्रता 4.2 इतकी होती. भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीपासून खाली 10 किलोमीटर होता, असे चीनच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. या भूकंपामुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही असे वृत्त आहे, तर दुसरीकडे भूतानमध्येही भूकंपाचे झटके बसले.