
युरोप फिरण्याची हौस असणाऱ्या व्यक्तींना एअर इंडियाने मोठी भेट दिली आहे. संपूर्ण युरोप स्वस्तात विमानाने फिरण्यासाठी एअर इंडियाने ‘वन इंडिया प्रमोशनल सेल’ची घोषणा केली आहे. या सेलअंतर्गत हिंदुस्थानातील व्यक्तींना एअर इंडियाने स्वस्तात युरोपचे तिकीट मिळणार आहे.
युरोपला जाणाऱ्यांसाठी एअर इंडियाने फ्लॅट भाडे
ऑफर केले आहे. वन इंडिया सेलसोबत ग्राहक आपला प्रवास स्वस्तात करू शकतील. हिंदुस्थानी नागरिकांना युरोपमधील शहरे, त्यांची संस्कृती, युरोपमधील पर्यटनस्थळे पाहता येतील. ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी सुरू करण्यात आल्याचे एअर इंडियाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या प्रमोशनल सेलअंतर्गत बुक करण्यात आलेल्या प्रत्येक तिकिटावर एकदा फ्रीमध्ये तारीख बदलण्याची सुविधा मिळेल. यामुळे प्रवाशांना प्लानिंग करण्यात जास्तीत जास्त फ्लेक्सिबिलिटी मिळेल. महाराजा क्लब सदस्याला झिरो कन्व्हिनियन्स फी मिळेल. जर या सदस्यांनी एअर इंडियाच्या वेबसाईट किंवा मोबाईल अॅपवरून तिकीट बुक केले तर त्यांना स्पेशल सेल भाडे आणि बचत करता येईल.
वन इंडिया सेल सर्वात आधी 7 सप्टेंबर ला केवळ एअर इंडियाची वेबसाईट आणि मोबाईल अॅपवर उपलब्ध असेल. त्यानंतर 8 ते 11 सप्टेंबर 2025 पर्यंत ट्रव्हल एजंट, एअर इंडियाचे विमानतळ, तिकीट ऑफिस आणि कस्टमर कॉन्टॅक्ट सेंटरमध्ये उपलब्ध केले जाईल. या सेलअंतर्गत ज्या काही जागा रिकाम्या आहेत, त्या जे आधी येईल त्या प्रवाशांना उपलब्ध करून दिल्या जातील. 31 मार्च 2026 पर्यंतच्या प्रवासासाठी ही तिकीट वैध असतील.
राऊंड ट्रिपसाठी भाडे
युरोपच्या कोणत्याही शहरांसाठी विमान भाडे
- इकोनॉमी क्लास – 47 हजार रुपये
- प्रीमियम इकोनॉमी – 70 हजार रुपये
- बिझनेस क्लास – 1 लाख 40 हजार रुपये
लंडन (हिथ्रो) साठी
- इकोनॉमी क्लास – 49,999 रुपये
- प्रीमियम इकोनॉमी – 89,999 रुपये
बिझनेस क्लास 1,69,999 रुपये