व्हॉट्सअॅपची वेब सेवा डाऊन

हिंदुस्थानात व्हॉट्सअॅपची वेब सर्व्हिस डाऊन झाली आहे. अनेक युजर्स व्हॉट्सअॅप वेबवर लॉग इन करू शकले नाहीत. व्हॉट्सअॅपचे मोबाईल अॅप मात्र सुरळीत सुरू आहे. अनेक युजर्सची व्हॉट्सअॅप वेब सुरू नसल्याच्या तक्रारी एकाच वेळी केल्या. वेबवर लॉग इन जरी झाले तरी मेसेज पाठवणे आणि ते रिसीव्ह करणे यात अडचणी येत असल्याचे सांगितले. सेवा सुरळीत होण्यासाठी युजर्सना वाट पाहावी लागेल.

ज्या युजर्सची व्हॉट्सअॅप वेबवरून लॉग आऊट केलंय, त्यांना पुन्हा लॉग इन करता येत नाही. मात्र जे आधीच व्हॉट्सऍप वेबवर लॉगिन आहेत, त्यांना मात्र कोणतीही समस्या येत नाही. रविवारी दुपारपासून ही समस्या उद्भवली आहे. याबाबत व्हॉट्सअॅपकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. व्हॉटसअॅप मोबाईल अॅपमध्ये कोणतीही समस्या नाही.