
कुर्ला ते विद्याविहार रेल्वे स्थानकांदरम्यान मंगळवारी रेल्के रुळाला तडा गेल्याने संपूर्ण मध्य रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. ऐन सकाळच्या सुमारास ही घटना घडल्याने कार्यालयात जाण्याची घाई करणाऱ्या नोकरदारांची प्रचंड तारांबळ उडाली. खबरदारीचा उपाय म्हणून लोकल ट्रेनच्या अनेक फेऱ्या रद्द करण्यात आल्या. तसेच सर्ल गाड्यांचा केग कमी करण्यात आल्या. त्यामुळे सायंकाळपर्यंत लोकल सेवेचे वेळापत्रक कोलमडले. कुर्ला ते विद्याविहार स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर सकाळी 8.55 च्या सुमारास तडा गेल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव लोकल ट्रेनचा वेग ताशी 30 किमीपर्यंत कमी करण्यात आला. त्यामुळे ऐन पीक अकर्सला लोकल ट्रेन एका मागोमाग रखडल्या. सकाळी कामाकर जाण्याच्या गडबडीत हा गोंधळ झाल्याने नोकरदारांची प्रचंड गैरसोय झाली.