नागपुरातील ठगाने मंत्रालयातील दालनात घेतले बोगस इंटरव्ह्यू, नोकर भरतीत लाखोंची फसवणूक, मंत्रालयाची सुरक्षा व्यवस्था भेदली; सहा वर्षांनी धक्कादायक प्रकार उघडकीस

सरकारी नोकरीच्या मोहापायी बऱयाचदा अनेकांची फसवणूक होते. मुख्यमंत्री व राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरमधील एका ठगाने मंत्रालयातील दालनातच बोगस मुलाखती घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे मंत्रालयाच्या सुरक्षा व्यवस्थेची पोलखोल झाली आहे.

मंत्रालयात कनिष्ठ लिपिकाची नोकरी देण्यासाठी सात आरोपींनी मंत्रालयात मुलाखत घेऊन 9 लाख 55 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून तीन आरोपी फरार आहेत. पोलिसांनी मागील आठवड्यात आरोपी हेनरीला मुंबईतून अटक केली. अजून काही आरोपी फरार असल्याची माहिती राहुल तायडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

अशी झाली फसवणूक

नागपूरच्या जरीपटकामधील राहुल तायडे हे नोकरीच्या शोधात होते. त्याच्या मित्रासोबत आरोपी लॉरेन्स हेनरी आला आणि मंत्रालयात नोकरी मिळवून देतो असे खोटे सांगून राहुल तायडेकडून 9 लाख 55 हजार रुपये घेतले.

‘मेडिकल फिटनेस’ प्रमाणपत्रासाठी तायडे यांची मुंबईतल्य जे. जे. रुग्णालयात वैद्यकीय चाचणी घेतली. त्यानंतर ते मंत्रालयात आले. मंत्रालयातील एका दालनाच्या बाहेर अन्य एक आरोपी शिल्पा उदापुरे अशी नावाची पाटी लागली होती. या केबिनमध्ये तायडेंची नोकरीसाठी मुलाखतही घेतली.

2019मध्ये पैसे घेऊनही नियुक्तीपत्रही दिले नाही. नोकरीसाठी तायडे यांनी तगादा लावल्यानंतर मंत्रालयाच्या प्रवेशाचे ओळखपत्र दिले. पण अनेक दिवस उलटल्यावरही नोकरीत रुजू करून न घेतल्यामुळे तायडे यांनी हुडकेश्वर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवली.

जून महिन्यात दाखल झाला होता गुन्हा

मूळचा नागपूरचा असलेला लॉरेन्स हेनरी नेक्सस एचआर सोल्युशन्स नावाची एक बोगस जॉब प्लेसमेंट एजन्सी चालवतो. या एजन्सीद्वारे त्याने मंत्रालयात नोकरी लावून देण्याचं आमिष दाखवून अनेकांची फसवणूक केली आहे. आपण खरोखर नोकरी देतोय हे भासवण्यासाठी चक्क मंत्रालयात पाचव्या मजल्यावरील दालनात मुलाखत ठेवली. सुरेश धमगाये या तरुणाची 6 लाख 89 हजार रुपये घेऊन फसवणूक केली. या प्रकरणी जून महिन्यात हुडकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

आरोपींमध्ये महिलेचाही समावेश

याप्रकरणी नागपूरमधील लॉरेन्स हेनरी या आरोपीला अटक करण्यात आली असून शिल्पा उदारपुरे, वसंतकुमार उदापुरे, विजय पाटनकर, नितीन साठे, सचिन डोळस, बाबर नावाचा शिपाई फरार आहे.

सीएसएमटीच्या तळघरात ब्रिटिशकालीन बंकर

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या वास्तूच्या तळघरात असलेल्या ब्रिटिशकालीन बंकरची डागडुजी तसेच रंगरंगोटी करून नवा साज देण्यात आला आहे. शेकडो वर्षांपूर्वीच्या या बंकरचा ब्रिटिशकाळात रेल्वेची रोकड सुरक्षित ठेवण्यासाठी वापर केला जात होता. कालपरत्वे रेल्वेचा मोठ्या प्रमाणावर व्यवहार ‘कॅशलेस’ झाल्याने ब्रिटिशकालीन बंकर मागील दहा-बारा वर्षांपासून वापराविना बंद होते. मात्र जुन्या काळातील तिजोरी या ठिकाणी अजूनही सुस्थितीत आहेत. अलीकडेच डागडुजी करून चकाचक बनवलेल्या या बंकरमध्ये येत्या महिनाभरात दक्षता विभागाचे कार्यालय सुरू केले जाणार आहे.