
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा राइट हँड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चार्ली किर्क यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. किर्क एका कार्यक्रमात बोलत असताना त्यांच्यावर एका कॉलेजवयीन विद्यार्थ्यासारख्या दिसणाऱ्या तरुणाने गोळ्या झाडल्या. त्यातली एक गोळी किर्क यांच्या मानेला लागली व त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या हत्येचा तपास करणाऱ्या FBI ने संशयित तरुणाचे काही फोटो जारी केले आहे. तसेच पोलिसांना या हत्येसाठी वापरण्यात आलेली रायफल देखील सापडली आहे.
चार्ली किर्क हे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे राइट हँड म्हणजे अत्यंत निकटवर्तीय होते. ते उजव्या विचारसरणीचे कार्यकर्ते होते. किर्क युटा व्हॅली विद्यापीठात आयोजित चर्चेत सहभागी होण्यासाठी आले होते. यावेळी आयोजित कार्यक्रमात माइकवरून संवाद साधत असताना अचानक एका व्यक्तीने त्यांच्यावर गोळी झाडली. गोळी किर्कच्या मानेला लागली. गोळी लागताच किर्क जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात पडले. त्यांना ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु अधिक रक्तस्त्राव झाल्याने, किर्क यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.