उत्तर प्रदेशातील 13 जिह्यांना रेड अलर्ट

उत्तर प्रदेशात शनिवारपासून मुसळधार पाऊस कोसळत असून उद्या रविवारीही मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. पुढचे 24 तास हे पावसाचे असणार आहेत, असे हवामान खात्याने म्हटले आहे. उत्तर प्रदेशातील कुशीनगर, महाराजगंज, सिद्धार्थनगर, गोंडा, बलरामपूर, श्रावस्ती, बहराईच, लखीमपूर, खिरी, सीतापूर, रामपूर, बरेली, पीलीभीत, शाहजहांपूर या जिह्यांचा समावेश आहे.