बायडेन सरकारमुळेच अमेरिकेत गुन्हेगारी वाढली; नागमल्लैया यांच्या हत्येनंतर ट्रम्प यांची प्रतिक्रिया

 

दोन दिवसांपूर्वीच अमेरिकेच्या डलासमध्ये एका हिंदुस्थानी वंशाच्या व्यक्तीची क्षुल्लक कारणावरून हत्या करण्यात आली. चंद्रमौली नागमल्लैया असे हत्या झालेल्या व्यक्तीचे आहे. दरम्यान USA पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपी योर्डानिस कोबोस-मार्टिनेझने त्याचा गुन्हा देखील कबूल केला आहे. या घटनेवर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.


अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चंद्रमौली नागमल्लैया यांच्या हत्येचा निषेध दर्शवला. चंद्रमौली नागमल्लैया यांची हत्या करणाऱ्याला कायद्यानुसार योग्य ती शिक्षा केली जाईल असे आश्वासन यावेळी दिले. तसेच अमेरिका पुन्हा सुरक्षिक देश करण्याचे आणि कोणत्याही बेकायदेशीर स्थलांतरित गुन्हेगारांबद्दल कठोर निर्णय़ घेण्याचे असे वचन दिले.

दरम्यान, चंद्रमौलीला मारणाऱ्या आरोपीवर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल झाले होते. मात्र त्यातूनही त्याची सुटका झाली. यावरून ट्रम्प यांनी मार्टिनेझची सुटका केल्याबद्दल जो बायडेन प्रशासनावरही आरोप केला. या व्यक्तीला यापूर्वी बाल लैंगिक शोषण, कार चोरी अशा भयानक गुन्ह्यांसाठी अटक करण्यात आली होती, परंतु जुने सरकार जो बायडेन यांच्या कारकिर्दीत त्याला परत सोडण्यात आले. कारण त्यांना त्यांच्या देशात असा वाईट आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचा माणूस नको होता,” असे ते म्हणाले.

कोण आहे चंद्र  नागामल्लैया?
चंद्र नागमल्लैया (50) हे मूळ कर्नाटकचे होते. गेल्या पाच वर्षांपासून डलासमधील सॅम्युएल बुलेव्हार्डवरील डाउनटाउन सूट्स मोटेलचे व्यवस्थापक होते. चंद्र नागमल्लैया यांच्या सोशल मीडिया प्रोफाइलनुसार, नागमल्लैया यांनी इंदिरानगर केंब्रिज स्कूलमध्ये त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण केले आणि बेंगळुरूच्या बसवनगुडी येथील नॅशनल कॉलेजमध्ये शिक्षण घेतले.

नागमल्लैया आणि त्यांचे कुटुंब 2018 मध्ये अमेरिकेत स्थलांतरित झाल्याचे वृत्त आहे. डलासमध्ये स्थायिक होण्यापूर्वी ते सुरुवातीला सॅन अँटोनियोमध्ये राहत होते. नागमल्लैया यांच्या पश्चात त्यांची पत्नी निशा आणि त्यांचा 18 वर्षांचा मुलगा गौरव आहे.

अमेरिकेत भररस्त्यात हिंदुस्थानी व्यक्तीचे शीर उडवले