
युवासेनेच्या पदांकरिता नेमणुका करण्यात येत असून मुंबईतील विधानसभानिहाय विभाग युवा अधिकारी, उपविभाग युवा अधिकारी, विधानसभा समन्वयक, विधानसभा चिटणीस, शाखा युवा अधिकारी व उपशाखा युवा अधिकारी या पदांकरिता रविवार, 21 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता मुलाखती घेण्यात येणार आहेत, अशी माहिती युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.
गोरेगाव विधानसभा मतदारसंघाकरिता शिवसेना शाखा क्र. 55, मध्यवर्ती शाखा, एस.व्ही. रोड गोरेगाव पश्चिम येथे तर वर्सोवा विधानसभेकरिता क्रेसमोंडे वर्ल्ड स्कूल, आझाद नगर नं. 1, अपना बाजार लेन, जे. पी. रोड, अंधेरी पश्चिम येथे मुलाखती होतील. अंधेरी पश्चिम विधानसभेकरिता शिवसेना मध्यवर्ती कार्यालय, शीतलादेवी बिल्डिंग, डी. एन. नगर अंधेरी पश्चिम तर अंधेरी पूर्व विधानसभेकरिता शिवसेना शाखा क्र. 80, जुना नागरदास रोड, चिनॉय कॉलेजजवळ, अंधेरी पूर्व येथे मुलाखती होतील. चांदिवली विधानसभेकरिता शिवसेना शाखा क्र. 162, सफेद पूल, साकीनाका येथे तर मुलुंड विधानसभेकरिता शिवसेना शाखा क्र. 105, 90 फीट रोड, मुलुंड पूर्व येथे मुलाखती होतील. शिवाजीनगर-मानखुर्द विधानसभेकरिता शिवसेना शाखा क्र. 140, न्यू गौतम नगर, विरोबा मंदिर शेजारी, गोवंडी येथे मुलाखती घेण्यात येतील.
युवासेनेचा पदाधिकारी होण्यास इच्छुक असणाऱ्यांनी युवासेनेचा सक्रिय सदस्य असणे आवश्यक आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीपूर्वी एक तास अगोदर उपस्थित राहावे. तसेच येताना आपले छायाचित्र सोबत आणावे. इच्छुक कार्यकर्त्यांसाठी माहिती अर्ज मुलाखती ठिकाणी ठेवण्यात येतील, असे युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.





























































