
अॅपलने ( 9 सप्टेंबर) ला आयफोन 17 सीरिज लाँच केली. त्यानंतर बाजारामध्ये हा फोन कधी येणार याची उत्सुकता अॅपलप्रेमींना लागली होती. (19 सप्टेंबर) IPhone17 चा सेल सुरु झाला. ही सिरीज लॉन्च झाल्यापासूनच चाहत्यांना या फोनची प्रचंड उत्सुकता लागलेली होती. त्यामुळे ग्राहकांनी रात्रीपासून मुंबईतील Apple Store बाहेर तोबा गर्दी करण्यास सुरुवात केली. हजारोंच्या संख्येने तरुणाई हा फोन विकत घेण्यासाठी तासनतास रांगेत उभे राहिल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
आयफोन 17 सीरिजच्या प्री ऑर्डरला जगभरातून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. एएनआयने यासंदर्भात एक व्हिडीओ शेअर केला आहे. मुंबईतील बीकेसी येथे असलेल्या अॅपल स्टोर बाहेर अॅपलाचा चाहता वर्ग पाहायला मिळत आहे. अनेकांनी या मोबाईलचे प्रीबुकिंग करून ठेवले होते. यामध्ये सर्वाधिक बुकिंग झालेला मोबाईल म्हणजे आयफोन 17 प्रो मॅक्स, जो कॉस्मिक ऑरेंज कलरमध्ये उपलब्ध आहे. या फोनला ग्राहकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे.
आयफोनसाठी कायपण…Apple 17 घेण्यासाठी ग्राहकांची उडाली झुंबड; मारामारी, ठोसे अन् झटापट
Apple Store बाहेर तासंतास रांग लावून उभे असलेल्या प्रत्येकालाच हा फोन खरेदी करायचाय. त्यामुळे लोकांनी अक्षरश: एकमेकांना धक्काबुकी करायला सुरूवात केली आहे. इतकच काय तर ग्राहकांमध्ये स्टोअरच्या बाहेर हाणामारीही झाली. तेथील परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये यासाठी पोलिसांना आणि स्टोअर सुरक्षा कर्मचाऱ्यांना हस्तक्षेप करावा लागला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
#WATCH | Mumbai | A customer, Aman Chouhan, says, “I have purchased iPhone 17PRO Max, one is 256GB and the other is 1TB. I was waiting in line since 12 midnight and now I have got it. It has new features. The orange colour is new…” https://t.co/NnweXyMyKN pic.twitter.com/LS3ns7rHxi
— ANI (@ANI) September 19, 2025
अशातच अमन चौहान नावाच्या एका तरूणाने देखील आयफोन 17 सीरिजमधील हेच 2 मोबाईलफोन विकत घेतले आहेत. दोन्ही फोन कॉस्मिक ऑरेंज कलरमध्ये असून त्यापैकी एक iPhone 17PRO Max (256GB) तर दुसरा (1TB) असल्याचे अमन चौहान याने सांगितले आहे. IPhone 17 साठी अमन गुरूवारी रात्री 12 वाजल्यापासून रांगेत उभा होता. या मोबाईलमध्ये 6.9 इंचांचा डिस्प्ले, 120 एचझेड रिफ्रेश रेट, आयओएस 26, ए19 प्रो प्रोसेसर, 48 प्लस 48 प्लस 48 प्लस मेगापिक्सलचा कॅमेरा (8xझूम), 18 मेगापिक्सलचा सेंटर स्टेज फ्रंट कॅमेरा असल्यामुळे या फोनला जास्त डिमांड मिळत आहे, असे त्यांने सांगितले.