
हार्बर रेल्वेमार्गावर पनवेल ते वाशी आणि मध्य रेल्वेमार्गावर ठाणे ते कल्याण रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. हार्बर अप आणि डाऊन मार्गावर पनवेल ते वाशीदरम्यान सकाळी 11.05 ते दुपारी 4.05 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. या अवधीत पनवेल येथून सकाळी 10.33 ते दुपारी 3.49 वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱया तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 9.45 ते दुपारी 3.12 वाजेपर्यंत बेलापूर/पनवेलकडे जाणाऱया डाऊन हार्बर मार्गिकेवरील गाड्या रद्द केल्या जाणार आहेत. तसेच पनवेल येथून सकाळी 11.02 ते दुपारी 3.53 वाजेपर्यंत ठाण्याकडे जाणाऱया अप ट्रान्स-हार्बर मार्गावरील गाडय़ा तसेच ठाणे येथून सकाळी 10.01 ते दुपारी 3.20 वाजेपर्यंत पनवेलकडे जाणाऱ्या डाऊन ट्रान्स-हार्बर मार्गावरील गाडय़ा रद्द असतील. ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान अप व डाऊन जलद मार्गावर सकाळी 10.40 ते 15.40 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.