समुद्रातील डिझेल चोरी पकडली

डिझेलची चोरी करून बेदरकारपणे निघालेल्या एका बोटीला यलोगेट पोलिसांनी खोल समुद्रात जवाहर द्वीप परिसरात पकडले. याप्रकरणी एकूण 18 जणांविरोधात गुन्हा दाखल करून मासेमारी बोट व साडेतीन हजार लिटर डिझेल असा 13 लाख 37 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. शुक्रवारी दुपारी ‘जयलक्ष्मी’ या मासेमारी बोटीवरील तांडेल विवेक कोकाटे (34) व विक्रांत मोरे (26) हे बोटीच्या मालकीण विनंती कोळी यांचे पती राजेश कोळी यांच्या सांगण्यावरून रायगडच्या मोरा येथील नंदू कोळी यांच्याकडून विनापरवाना अवैधरीत्या सुमारे तीन लाख 37 हजार 500 रुपये किमतीचे 3750 लिटर डिझेल घेऊन निष्काळजीपणे घेऊन निघाले होते.