
‘जगात आपला कोणीही मोठा शत्रू नाही. इतर देशांवरचे अवलंबित्व हाच आपला सर्वात मोठा शत्रू आहे. आपल्याला सगळय़ांना मिळून त्यावर मात करावी लागेल. आपण जितके जास्त त्या शत्रूवर अवलंबून राहू तितकी आपली अधोगती होईल,’ असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिला.
अमेरिकेने टाकलेल्या व्हिसा बॉम्बच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे वक्तव्य केले. गुजरात दौऱयावर असलेल्या मोदींनी तेथे सभेला संबोधित केले. त्यावेळी पुन्हा एका आत्मनिर्भर हिंदुस्थानचा नारा दिला. जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश आत्मनिर्भर होणे हे जागतिक शांतता, स्थैर्य आणि समृद्धीसाठी आवश्यक आहे. दुसऱयांवर आश्रित राहिलो तर आपल्या आत्मसन्मानाला ठेच लागेल. 140 कोटी देशवासीयांचे भविष्य, देशाचा विकास आपण दुसऱयावर सोपवू शकत नाही. भावी पिढीचे भविष्य पणाल लावू शकत नाही, असे मोदी म्हणाले. सौ दुःखों की एकही दवा है… ‘आत्मनिर्भर भारत’ असे ते म्हणाले.