
बीड जिल्ह्यातील शिरूर शहरामध्ये सिंदफणा नदीच्या पुराचे पाणी घुसले गावातील प्रत्येक गल्लीत नदी वाहू लागली, पुराच्या पाण्यामुळे शिरूर चा बाजार तळ उद्ध्वस्त झाला. आजच आठवडी बाजार भरतो पन्नास गावाचा भरणारा आठवडी बाजार पाण्यात बुडाला आहे .
सिंदफना नदीने अक्राळ विक्राळ रूप धारण केले आहे. पाणी नदी पात्रात न मावल्याने पुराचे पाणी शिरूर शहरात घुसले, शिरूर चा बाजार तळ उद्ध्वस्त झाला आहे. व्यापाऱ्यांच्या दुकानात पाणी साचले तर घरात ही पाणी घुसले आहे. मोठे नुकसान शिरूर मध्ये झाले आहे.