
आपल्या वेगाने बदलणाऱ्या जीवनशैलीत निरोगी राहणे एक आव्हान बनले आहे. आपल्या आहारामध्ये जास्त चरबीयुक्त पदार्थ समस्या बनत आहेत. परिणामी बरेच जण नानाविध उपायांच्या मागे लागतात. परंतु अनेकदा विविध उपाय करुनही आपल्याला हवा तसा रिझल्ट मिळत नाही. शिवाय आपले पैसेही बरेच खर्च होतात. त्यामुळेच घरच्या घरी अगदी साधे सोपे उपाय करणे केव्हाही उत्तम. वजन कमी करण्यासाठी आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणासाठी कढीपत्ता हा वरदानापेक्षा कमी नाही.
कढीपत्त्याचा वापर फक्त भाज्यांना किंवा पदार्थांना फोडणी देण्यासाठी नाही. तर कढीपत्त्यामध्ये अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि फायबरमुळे, कढीपत्ता इतर अनेक कारणांसाठी फायदेशीर आहे. भाज्यांव्यतिरिक्त त्यांचा वापर कुठे करता येईल हे समजून घेणे आवश्यक आहे.
कढीपत्ता पाणी कसे करावे?
दररोज सकाळी रिकाम्या पोटी कढीपत्ता पाणी पिल्याने चयापचय वाढतो आणि शरीरातील चरबी जाळण्यास मदत होते.
10 कढीपत्त्याची पाने घ्या आणि ते पूर्णपणे धुवा.
2 कप पाण्यात 5 मिनिटे उकळवा.
पाणी गाळून घ्या आणि ते गरम किंवा थोडे थंड प्या.
कढीपत्त्याचे काय फायदे आहेत?
कढीपत्ता केसांसाठी खूप चांगला मानला जातो. तसेच त्यात असलेले अँटिऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे केसांची मुळे मजबूत करतात आणि केस गळणे कमी करतात.
कढीपत्त्यामध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि दाहक-विरोधी गुणधर्म असतात. यामुळे त्वचेवरील डाग आणि जळजळ कमी करू शकतात.
कढीपत्ता खाल्ल्याने पोटफुगी, बद्धकोष्ठता आणि अपचन यासारख्या पोटाच्या समस्यांपासून आराम मिळतो.
Skin Care – त्वचा नैसर्गिकपणे उजळण्यासाठी हे फेशियल करायला हवे
कढीपत्त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते, ती कमी होते.
कढीपत्त्यामध्ये जीवनसत्त्वे अ, ब आणि क आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.
निरोगी शरीर राखायचे असेल तर, दिनचर्येत कढीपत्त्याचे पाणी समाविष्ट केले पाहिजे.