तीन महिन्यांतून किंवा सहा महिन्यांत एखाद् दुसरी पिकनिक करायला अनेकांना आवडते. शहरांपासून जवळ किंवा दूरच्या अंतरावर वन डे पिकनिक अनेक जण करत असतात.
अनेकदा पिकनिकचे नियोजन केल्यानंतरही ते बऱयाचदा बिघडते. असे होत असेल तर त्यासाठी काही टिप्स आहेत. सर्वात आधी पिकनिकला कुठे जाणार आहात हे ठरवा.
ठरलेले ठिकाण ऐनवेळी बदलल्यास जवळचे दुसरे शांत ठिकाण शोधा. जेथे तुम्हाला आरामात पिकनिक करता येईल. बाहेर जाणे शक्य नसेल तर घरीच एकत्र बसून गप्पा मारा.
पिकनिकच्या दिवशी अचानक हवामान खराब झाले असेल आणि बाहेर जाणे शक्य नसेल तर नियोजन रद्द करा आणि नियोजनाची पुढची तारीख ठरवा.
पिकनिकची योजना आखताना आधीच पुरेशी तयारी करा. पिकनिकसाठी एखादी थीम ठरवा. पिकनिकसाठी कोण कोण येणार आहेत त्यांना आधीच तयार करा.