ट्रेंड – मी व्हायरल आहे!

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर धुमाकूळ घालणाऱया मराठमोळ्या आज्जीबाईचा आणखी एक डायलॉग ट्रेंडमध्ये आला आहे आणि मी व्हायरल आहे व्हायरल. आता मी भीत नसते. मला फक्त केसाला धक्का लाव. सगळी येत्याल तुझ्यावर धावून. माझे जेवढे फॅन आहे ना फॅन. कशी करतात बघ मंग तुझी काशी. कॅमेरा घेऊनच येत्याल. मी आता गप्प बसणार नाही, असे हे डायलॉग इन्स्टावर खूपच फेमस झाले असून शेकडो तरुणींनी यावर रील केली आहे. त्यामुळे ’मी व्हायरल आहे’, हा शब्द चांगलाच ट्रेंडमध्ये आला आहे. याआधी याच आजीबाईचा डायलॉग काही नाही बोललो, गेली बया पळून…काही नाही बोललो, गेली बया पळून…अरे देवा…. हे शब्द ट्रेंडमध्ये आले होते. तेव्हापासून या आजीबाईचे फॅन चांगलेच वाढले आहेत.