
मुंबई महानगरात मेट्रो सेवांचा विस्तार होत आहे. याच पार्श्वभूमीवर मेट्रो प्रवाशांच्या सोयीसाठी ओएनडीसी नेटवर्कवर ‘वनतिकीट अॅप’ उपलब्ध करण्यात आले आहे. या अॅपच्या माध्यमातून प्रवासी नियमित प्रवासासाठी विविध मेट्रो मार्गिकांवर एकसंध (युनिफाईड) बुकिंग करू शकणार आहेत. वनतिकीट अॅप अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी प्ले स्टोअरमध्ये उपलब्ध आहे. तसेच आयओएस वापरकर्त्यांसाठी अॅप स्टोअरमध्ये ‘वनतिकीटइंडिया’ असे नाव देण्यात आले आहे.