रोज आपण किती किलोमीटर चालणे गरजेचे आहे?

चालणे हे आपल्या आरोग्यासाठी उत्तम मानले जाते. रोज चालण्यामुळे आपल्याला खूप सारे आरोग्यवर्धक फायदे मिळतात. पायी चालण्यामुळे आपल्या ह्द्याचे आरोग्य निरोगी राहते. तसेच आपल्या शरीरामध्ये रक्ताभिसरणही उत्तम राहते. वजन कमी होण्यासही चालण्यामुळे मदत मिळते.

रोज माऊथवाॅश वापरण्याचे कोणते दुष्परीणाम होतात, वाचा

चालण्यामुळे शरीराला अगणित फायदे मिळतात. आपल्या रक्तातील साखरेवरही उत्तम नियंत्रण ठेवता येते. त्याचबरोबर ह्द्यरोगाच्या विविध आजारांवर देखील मात करता येते. म्हणून चालणे हे आपल्या रोजच्या दिनचर्येचा भाग होणे हे गरजेचे आहे. चालण्यामुळे आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राहण्यास मदत मिळते.

नियमित चालण्याचा व्यायाम केल्यामुळे, आपले शरीर निरोगी राहण्यास मदत मिळते. तसेच आपले चयापचयही वाढते. मुख्य म्हणजे आता किती अंतर चालायचे हा महत्त्वाचा प्रश्न आहे.

आॅफिसमध्ये काम करताना योग्य पद्धतीने कसे बसावे, जाणून घ्या

सध्याच्या घडीला जपानमध्ये १० किलोमीटर चालण्याचा ट्रेंड खूप लोकप्रिय आहे. परंतु हिंदुस्थानात राहणाऱ्यांसाठी मात्र हा ट्रेंड गरजेचा नाही. एकूणच आपली शरीरयष्टी पाहता आपण रोज किमान अर्धा तास चालणे गरजेचे आहे. चालतानाही आपल्याला इतर अनेक गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. जसे की, पोषक तत्वांचा आहारात सर्वाधिक समावेश करणे. त्याचबरोबर चालण्याआधी स्ट्रेचिंगचा व्यायाम करणे, म्हणजे मसल्सला इजा होण्यापासून आपण वाचू शकतो.

चालण्याआधी या काही महत्त्वाची काळजी घेतल्यास, चालण्याचा व्यायामाची सुरुवात कधीही करु शकता.