
दिल्लीतील श्री शारदा इन्स्टिटय़ूटमध्ये 17 विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असणाऱया स्वामी चैतन्यानंद सरस्वती ऊर्फ पार्थ सारथीला पटियाला हाऊस कोर्टाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. चैतन्यानंदची पाच दिवसांची पोलिस कोठडी संपल्यानंतर त्याला न्यायलयाने ही कोठडी सुनावली. दरम्यान, दिल्ली पोलिसांनी चैतन्यानंदच्या तीन जवळच्या महिला सहकाऱयांना अटक केली आहे. अटक केलेल्या महिलांमध्ये श्री शारदा इन्स्टिटय़ूटच्या श्वेता शर्मा (असोसिएट डीन), भावना कपिल (कार्यकारी संचालक) आणि काजल (वरिष्ठ प्राध्यापक) यांचा समावेश आहे.