
पिकअप व्हॅनने दुचाकी आणि ट्रकला धडक दिल्याने भीषण अपघाताची घटना घडली आहे. या अपघातात चौघांचा मृत्यू झाला असून 15 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. रविवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
गुजरातच्या पाटन जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गावरील मोती पिपली गावाजवळ हा अपघात झाला. पिकअप व्हॅनमध्ये 15 प्रवासी होते. पुढील वाहनांना ओव्हरटेक करण्याच्या नादात पिकअपने आधी दुचाकीला धडक दिली आणि त्यानंतर ट्रकवर आदळली. यात दुचाकीवरील दोघे आणि पिकअपमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य 15 जण जखमी झाले. लक्ष्मण देसाई, यश उन्चोसन, कानू रावल आणि नसीब खान अशी मयतांची नावे आहेत.