घरातील डासांना पळवून लावायचंय… हे करून पहा

डासांपासून सुटका करण्यासाठी काही घरगुती उपाय करता येतील. घरात असलेल्या काही नैसर्गिक गोष्टी वापरणे चांगले. कापूर आणि तमालपत्राचा वापर करून डासांना पळवता येते. तुम्ही शेणाच्या गोवऱया घेऊन त्यावर कापूर आणि तमालपत्र ठेवा व ते जाळा. त्याचा धूर डास आणि इतर कीटकांना दूर पळवतो.

डासांपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही कडुलिंबाची पाने जाळू शकता. लवंग आणि लिंबूदेखील खूप प्रभावी आहेत. लिंबू दोन भागांमध्ये कापून घ्या आणि नंतर त्यात लवंगा ठेवा. हे लिंबू कोपऱयात, खिडकीच्या चौकटीत इत्यादी ठिकाणी ठेवा, जेणेकरून डास त्याच्या वासाने पळून जातील. कांदा आणि लसूणची साले डासांना दूर ठेवण्यासाठी खूप उपयुक्त आहेत.