
अतिवृष्टीमुळे शेत आणि घरसंसार उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे, मात्र राज्य सरकारकडून नुकसानभरपाई देण्याकरिता कारणे सांगून वेळकाढूपणा केला जात आहे. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱयांना तातडीने मदत मिळावी या मागणीकरिता शिवसेना राज्यव्यापी आंदोलन करणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेनेच्या वतीने 8 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी व तहसील कार्यालयांवर धडक आंदोलन व निदर्शने करण्यात येणार आहेत.
सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे संपूर्ण महाराष्ट्रात खासकरून मराठवाडय़ात मिळून एकूण 6 लाख हेक्टर शेतीचे नुकसान झाले. मात्र नाकर्त्या राज्य सरकारने अद्यापपर्यंत महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्जमाफी करून शेतकऱयांना भरीव दिलासा दिला होता, पण यावेळेस या महाभयंकर जलप्रलयात सर्वस्व गमावलेल्या शेतकऱ्यांबद्दल विद्यमान महायुती सरकारला काहीच कळवळा आलेला नाही. शेतकऱयांच्या मागण्यांसाठी आवाज उठवतानाच निर्दयी सरकारचा निषेध या आंदोलनाद्वारे केला जाणार आहे. या आंदोलनात हजारो शेतकरी व शिवसैनिक स्-ाहभागी होणार असल्याची माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात देण्यात आली आहे.
शिवसेनेच्या मागण्या…
- अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीसाठी शेतकऱयांना हेक्टरी रुपये 50 हजार इतकी थेट आर्थिक मदत त्वरित जाहीर करावी.
- नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या महाराष्ट्रातील सर्व शेतकऱयांचे संपूर्ण कर्जमुक्त करावे.
- पीक विम्याचे कठीण निकष पूर्ववत करून विम्याची रक्कम त्वरित शेतकऱयांच्या खात्यात जमा करावी.
- अतिवृष्टीमुळे घरे व पशुधनाचे नुकसान झालेल्या नागरिकांना, जुने निकष न लावता, योग्य आणि पुरेसा मोबदला त्वरित देण्यात यावा.
स्थळ – सर्व जिल्हाधिकारी व तहसील कार्यालये
वेळ – सकाळी 11 वाजता