सोशल मीडिया इन्फ्लुएंजर, सरकारचा नवीन अभ्यासक्रम

राज्यातील 419 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये आणि 141 शासकीय तांत्रिक विद्यालयांमध्ये 2 हजार 506 तुकडय़ा सुरू करण्यात येणार आहेत. या माध्यमातून 75 हजार प्रशिक्षणार्थ्यांना रोजगारक्षम कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार आहेत. पुढील वर्षात 1 लाख प्रशिक्षणार्थींना रोजारक्षम कौशल्य प्रशिक्षण देण्याची महत्त्वाकांक्षी योजना आहे. यंदा प्रथमच ‘सोशल मीडिया इन्फ्लुएंजर’ अभ्यासक्रम सुरू होणार आहे.

या कार्यक्रमाअंतर्गत आधुनिक तंत्रज्ञानाशी निगडित अभ्यासक्रमांचा समावेश असून यात ऑडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग, ड्रोन तंत्रज्ञान, इलेक्ट्रिक वाहन, सोलर ऊर्जा, सायबर सुरक्षा इंटरनेट ऑफ थिंग्ज, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ग्रीन हायड्रोजन, मोबाईल दुरुस्ती, सोशल मीडिया इन्फ्लुएंजर इत्यादी विषयांचा समावेश असल्याची माहिती कौशल्य विकास व नावीन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली. ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी https://admission.dvet.gov.in या वेबसाईटवर नावनोंदणी करावी.