
महागडय़ा व स्वस्त वस्तूंची ऑर्डर देऊन मग त्या वस्तूंच्या बॉक्सवरील बारकोड स्टिकरची अदलाबदल करून नामांकित ई-कॉमर्स कंपन्यांची आर्थिक फसवणूक करणारी आंतरराज्यीय टोळी मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट-8 च्या पथकाने जेरबंद केली आहे.
महागडय़ा वस्तूचा बारकोड स्टिकर स्वस्त वस्तूंच्या बॉक्सवर चिटकवून ते स्वस्त वस्तू महागडी वस्तू म्हणून कंपन्यांना परत करतात अशी माहिती युनिट-8 ला मिळाली. त्यानुसार प्रभारी निरीक्षक लक्ष्मीकांत साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि रोहन बगाडे व पथकाने तपास करून बोरिवली पश्चिमेला चौघांना पकडले. त्यातील तिघे हरयाणा तर एक छत्तीसगडचा आहे. त्यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता चौघांनाही 13 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. आरोपींकडून 45 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.