
सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या वकिलांबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकरणी आता वकील राकेश किशोर तिवारी यांची सदस्यता रद्द करण्यात आली आहे. सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनचे मुख्य न्यायाधीश (SCBA) भूषण रामकृष्ण यांनी हा निर्णय घेतला आहे.
वकील राकेश किशोर हे 2011 पासून सुप्रीम कोर्टाच्या बार असोसिएशनचे अस्थायी सदस्य होते. यापूर्वी बार काउन्सिल ऑफ इंडियाने राकेश किशोर यांचे वकिली प्रशिक्षण रद्द केले होते.
नेमकं प्रकरण काय?
दरम्यान, 6 ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना वकील राकेश किशोर यांनी ‘सनातन का अपमान नही सहेगा हिंदुस्थान’ अशा घोषणा देत सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, सुरक्षा रक्षकांनी त्याना वेळीच ताब्यात घेतले. या घटनेचा देशभरातून निषेध केला जात आहे. संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत.