
जगभरातील तब्बल 45 देशांच्या प्रतिनिधींचा सहभाग असलेल्या एआय इम्पॅक्ट समिट 2026 ला आज राजधानी दिल्लीतील भारत मंडपममध्ये सुरुवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी उद्घाटनपर भाषण केले. ‘ही परिषद प्रगतीशील, नाविन्यपूर्ण आणि अफाट संधींची दारे खुली करून भविष्याला आकार देणारी ठरेल,’ असा विश्वास मोदींनी यावेळी व्यक्त केला.
‘सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय’ अशी या शिखर परिषदेची संकल्पना आहे. एआयचा वापर मानवपेंद्री विकासासाठी करण्याची कटिबद्धता यातून दिसते. आज एआय आरोग्यसेवा, शिक्षण, शेती, प्रशासन आणि उद्योग यासह अनेक क्षेत्रांमध्ये परिवर्तन घडवत आहे. या परिषदेत एआयच्या विविध पैलूंवर चर्चा होईल आणि ती समृद्ध करणारी ठरेल, असे मोदी म्हणाले.


























































