बोलीभाषेची समृद्धी – चंदगडी बोली

>> वर्णिका काकडे

महाराष्ट्रातील कोल्हापूर या जिह्यात चंदगड हा तालुका आहे. या तालुक्याचे स्थान पाहता या तालुक्याच्या पूर्वेला कर्नाटक राज्य, पश्चिमेला सिंधुदुर्ग जिल्हा आणि दक्षिणेला गोवा राज्य आहे. या परिसरात ‘चंदगडी बोली’ बोलली जाते. कोल्हापूर या जिह्याच्या ठिकाणापासून सर्वाधिक अंतर कोकणी या दोन्ही भाषांचा प्रभाव उन्नत शेती क्षेत्राची दुमत आहे व अशा अनेक कारणांमुळे स्वतची वैशिष्टय़े आढळतात.

 चंदगडी बोली उच्चारदृष्टय़ा वैशिष्टय़पूर्ण असून विशिष्ट हेल काढून बोलणे ही या बोलीची खासियत आहे. शब्दसंग्रह उच्चाराचा विशिष्ट हेल व्याकरणिक विशेष सर्वच बाबतीत चंदीगड बोलीचे वेगळेपण दिसून येते कोणत्याही विस्तृत प्रदेशात भाषा बोली एक सारख्या आढळत नाहीत. त्याचप्रमाणे चंदगड तालुक्यामध्ये देखील बोली मध्ये वेगवेगळेपणा आढळतो. परंतु या सर्व विस्तृत प्रदेशात बोलल्या जाण्राया बोलीला ‘चंदगडी बोली’ अशा एकाच नावाने ओळखले जाते.

 चंदगडी बोली ही प्रमाण मराठीशी नाते सांगणारी परंतु शब्दसंग्रह व्याकरणिक व्यवस्था, उच्चार वैशिष्टय़े इत्यादी संदर्भात स्वतचे वेगळेपण जपलेली बोली आहे.. सुशिक्षित वर्गाच्या लक्ष व्यवहारात प्रमाण मराठीचा समावेश असतो. परंतु चंदगड हा तालुका ज्या कोल्हापूर जिह्यामध्ये येतो, त्या कोल्हापूर पासूनही तो सुमारे दीडशे किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे या बोलीची स्वतंत्र उच्चार प्रणाली दिसून येते. चंदगडी बोली अभ्यास मराठीची बोली म्हणूनच करावा लागतो. चंदगडी बोली शब्दसंग्रह व उच्चार विशेष यांच्या आधारे या बोलीच्या निर्मिती ऐतिहासिक कल्पना करता येते.

चंदगड मध्ये सण वगैरे असतात तेव्हा गाणी गाण्याची प्रथा आहे. या गाण्यांना चंदगडी बोलीत ‘गित्ती’ म्हणतात. प्रमाण भाषेपेक्षा बोली जिवंत आणि अधिक प्रभावी असतात. त्यामुळे एखाद्या विस्तृत प्रदेशातील बोली सर्वत्र एकसारखी आढळत नाही. बोलीतील शब्दांचे उच्चार, हेल यांची तुलना प्रमाण भाषेची करता मोरी चे वेगळेपण लक्षात येते. उदा. ‘वसुला’ हा शब्द प्रमाण मराठीतील वसूल, वसुली या शब्दाची संबंधित आहे. चंदगडी बोलीतील ‘वसुला’ हा शब्द ‘वशिला’ या अर्थाने वापरला जातो. ‘वट’ हा शब्द ‘हुकूमत’ या अर्थाने वापरला जातो. तर ‘वट्टात’ हा शब्द चंदगडी बोलीत दोन भिन्न अर्थाने प्रचलित आहे. ‘मिय्या वट्टात वाटणी देऊसकी न्हाय’ या वाक्यामध्ये तो अजिबात या अर्थाने येतो. ‘आमी वट्टात श्यात करू लावात’ या वाक्यात तो एकत्र या अर्थाने वापरतात. अशी अनेक उदाहरणे देता येतील.