रत्नागिरीत मधुमेह, रक्तदाब पाठोपाठ कर्करोग रूग्णांची संख्या वाढतेय, आरोग्य तपासणीतून पुढे आली माहिती

रत्नागिरी जिल्हापरिषदेने राबवलेल्या स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानातंर्गत आरोग्य तपासणीतून धक्कादायक आकडेवारी पुढे आली आहे. 3 हजार ८३९ आरोग्य तपासणी शिबिरातून दोन लाख नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यामध्ये मधुमेहाचे ३० हजार ९८५ रूग्ण सापडले.उच्च रक्तदाबाचे २८ हजार ३०२ रूग्ण सापडले आहेत.कर्करोगाचे १४ हजार ७७७ रूग्ण सापडले आहेत.

प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रूग्णालय, उपजिल्हा रूग्णालय व जिल्हा शासकीस रूग्णालयात ही आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करण्यात आली. याशिबिरात कर्करोगाचे १४ हजार ७७७ रूग्ण सापडले.त्यामध्ये मुख कर्करोगाचे ७ हजार ४६४ रूग्ण, स्तन कर्करोगाचे ३ हजार ६७९ रूग्ण,गर्भाशय मुख कर्करोगाचे ३ हजार ७३४ रूग्ण सापडले आहेत. रक्तक्षयाचे ४३ हजार २७६ रूग्ण सापडले आहेत.त्यामध्ये ३२ हजार २०८ महिला आणि ११ हजार ६८ पुरूष रूग्ण आहेत.