
बिहार निवडणुकीला एक महिन्यापेक्षा कमी वेळ शिल्लक आहे. असं असलं तरी एनडीएमध्ये अद्याप जागावाटपावरून एकमत झालेलं नाही. जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित करण्यासाठी दिल्लीत भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या निवासस्थानी बिहार भाजपच्या कोअर कमिटीची बैठक सुरू आहे. या बैठकीत केंद्रीय मंत्री अमित शहा, विनोद तावडे, धर्मेंद्र प्रधान, सम्राट चौधरी, दिलीप जयस्वाल, नितीन नवीन, नित्यानंद राय आणि इतर अनेक प्रमुख नेते उपस्थित आहेत. यातच एक मोठी अपडेट समोर आली आहे. जागावाटप सुरळीत व्हावं म्हणून यावेळी भाजप बिहारमध्ये छोट्या भावाची भूमिका स्वीकारणार आहे, अशी माहिती समोर आली आहे.
‘एनडीटीव्ही इंडिया’ने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, यावेळी बिहारमध्ये एनडीएमधील मित्रपक्ष जेडीयू सर्वाधिक जागांवर निवडणूक लढवणार आहे. यावेळी बिहरमध्ये जेडीयू 101, भाजप भाजप 100, एलजेपी 26, हिंदुस्थानी अवाम मोर्चा 7, आरएलएम 6 जागांवर निवडणूक लढू शकते.
दरम्यान, बिहार विधानसभा निवडणूक 2020 मध्ये जेडीयूने 115 जागा लढवल्या आणि 43 जागा जिंकल्या होत्या. म्हणजेच अर्थ त्यांना 72 जागा गमवाव्या लागल्या. तर भाजपने 110 जागा लढवून 74 जागा जिंकल्या होत्या.