
इलॉन मस्क यांच्या स्टारलिंकचे सॅटेलाइट इंटरनेट हिंदुस्थानात मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 2026 पासून ग्राहकांना ही सुविधा मिळणार आहे. ही सुविधा सुरू झाल्यानंतर ग्राहकांना 25 एमबीपीएस ते 225 एमबीपीएसपर्यंतचा स्पीड ग्राहकांना मिळेल. स्टारलिंकचा बेसिक प्लान हा 225 एमबीपीएस असून यासाठी ग्राहकांना स्टारलिंक सेवेचा सेटअप चार्ज जवळपास 30 हजार रुपये आणि दरमहा 3300 रुपये मोजावे लागतील. 225 एमबीपीएसपर्यंतच्या स्पीडसाठी ग्राहकांना किती रुपये महिना द्यावा लागेल याची माहिती अद्याप समोर आली नाही. ही सुविधा सॅटेलाइट असल्याने कोणत्याही भागात सहज उपलब्ध होऊ शकेल. परंतु, इंटरनेट सेवा सुरू करण्यासाठी 30 हजार रुपये आधी जमा करावे लागतील.