
ओपी जिंदाल ग्रुपच्या प्रमुख सावित्री जिंदाल हिंदुस्थानातील सर्वात श्रीमंत महिला ठरल्या आहेत. फोर्ब्ज इंडिया रिच लिस्ट 2025 ची देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची यादी प्रसिद्ध केली असून या यादीनुसार, रिलायन्सचे मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्यानंतर त्या सर्वात श्रीमंत आहेत. त्यांच्याकडे एकूण 39.6 अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे. सावित्री जिंदाल जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये 48 व्या क्रमांकावर आहेत. एप्रिलमध्ये, फोर्ब्ज अब्जाधीशांची यादी ज्यांची एकूण संपत्ती किमान 1 अब्ज अमेरिकन डॉलर्स म्हणजेच 8,300 कोटी रुपये किंवा त्याहून अधिक आहे.