व्यापार युद्धाला धार; अमेरिकेचा चीनला दणका, आणखी 100 टक्के टॅरिफ लादले

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे टॅरिफ हल्ले सुरूच असून त्यांनी आज चीनला आणखी एक दणका दिला. ट्रम्प यांनी चिनी आयातीवर 100 टक्के अतिरिक्त टॅरिफ लावण्याची घोषणा केली. नव्या निर्णयाची अंमलबजावणी 1 नोव्हेंबरपासून होणार आहे.

दुर्मिळ खनिज निर्यातीवरील निर्बंध अधिक कठोर करण्याच्या चीनच्या निर्णयाला उत्तर म्हणून ट्रम्प यांनी हे पाऊल उचलले. चिनी आयातीवर अमेरिकेत सध्या 40 टक्के टॅरिफ आहे. नव्या निर्णयामुळे ते 140 टक्के होईल. टॅरिफशिवाय अमेरिकेने सॉफ्टवेअर चीनला निर्यात करण्यावरही निर्बंध लादले आहेत.

चीननं निर्यातीवर कठोर निर्बंध लादलेत. आंतरराष्ट्रीय व्यापारात असं कधीच झालं नव्हतं. हा इतर देशांचा अपमान आहे. याचे गंभीर परिणाम होतील आणि जे होईल त्याची नोंद इतिहास घेईल.