
सिंहगड पीएमएवाय सोसायटी परिसरात एका पिसाळलेल्या भटक्या कुत्र्याने येथील पाच मुलांना चावा घेतला, पाच मुलांसह भटक्या आणि दोन भटक्या तर परिसरातील पाच पाळीव कुत्र्यांनाही चावा घेतल्याची माहिती रहिवाशांनी दिली. रात्री उशिरा महापालिकेच्या पथकाने कुत्र्याला पकडले.
नागरिकांनी महापालिका आणि स्वयंसेवी संस्थेला कळवले. महापालिकेच्या सहायक आयुक्त प्रज्ञा पोतदार पवार यांना ही माहिती मिळाली. श्वान पथकाच्या तीन गाड्या आणि १५ ते २० पथकांतील कर्मचाऱ्यांनी तेथे धाव घेतली. रात्री दहाच्या सुमारास महापालिका पाळीव व कुत्र्यांनाही चावा श्वानपथक आणि युनिव्हर्सल स्वयंसेवी संस्थेच्या पथकाने तत्परतेने कारवाई करत या पिसाळलेल्या कुत्र्याला अखेर पकडले. तसेच चावा घेतलेल्या इतर भटक्या कुत्र्यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. जखमी झालेल्या मुलांवर ससून हॉस्पिटल आणि कमला नेहरू रुग्णालयात उपचार सुरू आहेत.




























































