
नामिबियाने क्रिकेट विश्वातील सर्वात मोठा उलटफेर करत बलाढ्य दक्षिण आफ्रिकेला पराभवाची धूळ चारली. विंडहोक येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-20 लढतीत नामिबियाने दक्षिण आफ्रिकेचा 4 विकेट्सने पराभव केला. डरबनममध्ये जन्मलेला रुबेन ट्रम्पेलमॅन हा नामिबियाच्या विजयाचा नायक ठरला. त्याने गोलंदाजी आणि फलंदाजीतही उपयुक्त योगदान दिले.
दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 8 बाद 134 धावा केल्या. याच लढतीद्वारे क्विंटन डीकॉक याने पुनरागमन केले, त्यालाही काही विशेष करता आले नाही. नामिबियाकडून ट्रम्पलमॅन याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.
आफ्रिकेने विजयासाठी दिलेले आव्हानाचा नामिबियाने यशस्वी पाठलाग केला. नामिबियाचा कर्णधार इमास्मस याने 21 धावांची खेळी केली. त्यानंतर इतर खेळाडूंनी योगदान देत नामिबियाला विजयाजवळ आणले. अखेरच्या चेंडूवर नामिबियाला विजयासाठी 1 धावांची गरज होती. जेन ग्रीन याने या चेंडूवर चौकार ठोकत संघाला अविस्मरणीय विजय मिळवून दिला.
HISTORY IN WINDHOEK 😳
Namibia beat South Africa in their first-ever meeting. A dream start at their new home ground💥#NAMvSA pic.twitter.com/RW8daWpeu8
— FanCode (@FanCode) October 11, 2025