मूग डाळ सर्व वयोगटासाठी का आरोग्यवर्धक आहे? वाचा

मूग डाळ सर्व वयोगटासाठी पौष्टिक अन्न आहे. ही डाळ केवळ आपल्या शरीराचे पोषण करत नाही तर, हृदय, मन आणि त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे. आपल्याकडे पाककृतींमध्ये मूग डाळीचे विशेष स्थान आहे. ही डाळ केवळ स्वादिष्टच नाही तर आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर देखील मानली जाते. खिचडी असो, डाळ-भात असो किंवा आरोग्यदायी नाश्ता असो, मूग डाळ अगदी योग्य पर्याय मानला जातो.

दिवाळी फराळ- तुमच्याही करंज्या फसताहेत का, मग या टिप्स वापरून बघा, करंजी होईल खुसखुशीत

आयुर्वेदानुसार मूग डाळ ही त्रिदोष नष्ट करणारी मानली जाते. मूग डाळ हलकी आणि सहज पचण्याजोगी असते. यामुळे आजारी, वृद्ध किंवा कमकुवत पचन असलेल्यांसाठी उत्तम पर्याय आहे. विशेषतः पोटदुखी किंवा अपचनाच्या बाबतीत, मूग डाळ खिचडी औषधासारखे काम करते.

मूग डाळीमध्ये प्रथिने जास्त आणि चरबीचे प्रमाण खूप कमी असते. यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यास मदत मिळते. मूगडाळीच्या सेवनामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो. याव्यतिरिक्त मूगडाळीचा कमी ग्लायसेमिक इंडेक्स आहे. यामुळे मधुमेहींसाठी ही डाळ सर्वात उत्तम पर्याय आहे. मूग डाळ खाल्ल्याने रक्तातील साखर अचानक वाढत नाही. यामुळे मधुमेह नियंत्रित होण्यास मदत होते.

बेलाचे फळ आपल्या आरोग्यासाठी वरदान का मानले जाते, वाचा सविस्तर

मूग डाळीमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन सी, ई आणि फॉलिक अॅसिड शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. बदलत्या ऋतूंमध्ये संसर्ग आणि आजारांचा धोका वाढतो, तेव्हा ही डाळ शरीराला आतून मजबूत करते. त्यातील पोषक घटक त्वचेला उजळवतात आणि केस गळणे देखील कमी करतात.

मूग डाळीमध्ये चांगल्या प्रमाणात फायबर असते. हे आपल्या पचनासाठी फायदेशीर असते. परंतु या डाळीचे अधिक प्रमाणात सेवन केल्याने, गॅस आणि पोटफुगीसारख्या समस्या उद्भवतात. मूग डाळ हृदय, मेंदू आणि त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे, परंतु ते मध्यम प्रमाणात आणि योग्य पद्धतीने सेवन करणे महत्वाचे आहे.