दिवाळीनंतर शेतकऱ्यांसाठी राज्यव्यापी आंदोलन उभारणार, मनोज जरांगे पाटील यांची घोषणा

दिवाळीनंतर शेतकऱ्यांसाठी राज्यव्यापी आंदोलन उभारणार, अशी घोषणा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. धाराशिवच्या कळंब तालुक्यातील डिकसळ येथे माध्यमांशी संवाद साधताना ते असं म्हणाले आहेत. ते म्हणाले आहेत की, “असं आंदोलन उभं करावं लागेल की, येथून पुढे आणि मागे 100 वर्षात असं आंदोलन कोणी केलं नसेल. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करु घ्याव्या लागतील.”

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, “मुंडक्यावरच पाय द्यावा लागेल. नुसतं वावरात फिरल्यानं, भाषण केल्यानं, चिखलात फिरल्यानं शेतकऱ्यांचा उद्ध्वस्त झालेला संसार भरून निघणार नाही. शेतकऱ्यांच्या पिकाला चांगला भाव द्यायचा असेल कर्जमुक्ती करायची असेल. नुकसानीची शंकर टक्के भरपाई द्यायची असेल तर, ताकतीने आंदोलन लावून धरावं लागणार आहे, त्यासाठी मी प्रयत्न करतोय.