डॉ. राजेश गवांदे एफडीआयच्या प्रमुखपदी  

राज्य शासनाने नव्यानेच थेट परकीय गुंतवणूक (एफडीआय) या विशेष कक्षाची स्थापना केली असून या विभागाची जबाबदारी आयएफएस अधिकारी डॉ. राजेश गवांदे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

या कक्षाच्या माध्यमातून महाराष्ट्रात अधिकाधिक विदेशी गुंतवणूक आकर्षित करण्याचा उद्देश आहे. या नव्याने स्थापन झालेल्या कक्षाचे नेतृत्व करण्यासाठी प्रादेशिक पासपोर्ट अधिकारी राजेश गवांदे यांची  एफडिआय प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच भारतीय परराष्ट्र सेवा (आयएफएस) अधिकाऱयाची राज्य शासनात प्रतिनियुक्तीवर नियुक्ती झाली आहे.