
बॉलीवूडचा अभिनेता आमिर खानच्या दंगल चित्रपटातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री जायरा वसीम पुन्हा एकदा चर्चेत आलीए. जायराने 2019 मध्ये बॉलीवूडला रामराम केलं होतं. त्यांनतर ती सोशल मीडियावर कमी सक्रिय होती. मात्र बऱ्याच वर्षांच्या ब्रेकनंतर जायरा पुन्हा एकदा चर्चेत आलीए. कारण जायराने 24 व्या वर्षी निकाह केला असून तिच्या चाहत्यांना आनंदाचा धक्का दिला आहे. जायराने यासंदर्भात सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.
View this post on Instagram
जायराने तिच्या सोशल मीडियावर तिच्या निकाहचे 2 फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोमध्ये, झायरा तिच्या निकाहनामावर स्वाक्षरी करताना दिसत आहे, तिच्या हातांमध्ये मेंदी आणि लग्नाची अंगठी दिसत आहे. दुसऱ्या फोटोमध्ये, झायरा तिच्या पतीसोबत चंद्राकडे पाहत असल्याचे दिसून येते. या फोटोसोबत जायराने कबूल है… असं कॅप्शनही दिले आहे. तिने शेअर केलेल्या या फोटोंवर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
वयाच्या 16 व्या वर्षी जायराने 2016 मध्ये आमिर खानच्या दंगल या चित्रपटात काम केलं होतं. या चित्रपटात जायराने साकारलेली कुस्तीपटू गीता फोगाटची भूमीका साकारली होती. या चित्रपटामुळे तिला वयाच्या 16 वर्षी खूप प्रसिद्धी मिळाली. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. यानंतर 2017 मध्येही सिक्रेट सुपरस्टार या चित्रपटात जायकने काम केलं. मात्र सलग दोन वर्ष प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या जायराने 2019 मध्ये बॉलीवूडमधून एक्झिट घेण्याचा निर्णय घेतला.