चेन्नईत चेंगराचेंगरीत मृत पावलेल्यांच्या कुटुंबीयांना अभिनेता विजयकडून प्रत्येकी 20 लाख रुपयांची मदत

तमिळगा वेत्री कळगम (टीव्हीके) पक्षाने 27 सप्टेंबर रोजी करूरच्या वेलुसामीपुरम येथे झालेल्या पहिल्या सार्वजनिक सभेदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत मृत झालेल्या 41 जणांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत दिली आहे. टीव्हीकेने प्रत्येक कुटुंबाला 20-20 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. पक्षाने दिलेल्या निवेदनानुसार, ही रक्कम 5 जिल्ह्यांतील 38 कुटुंबांच्या बँक खात्यांमध्ये जमा करण्यात आली आहे.

यापूर्वी तमिळनाडू राज्य सरकारनेही या कुटुंबांना प्रत्येकी 10-10 लाख रुपयांची नुकसानभरपाई दिली होती. अधिकाऱ्यांची परवानगी मिळताच पक्षाचे संस्थापक आणि प्रसिद्ध अभिनेते विजय हे या कुटुंबांना भेट देऊन आपली सहानुभूती आणि पाठिंबा व्यक्त करतील. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, या चेंगराचेंगरीच्या घटनेची चौकशी सध्या
सीबीआयकडून केली जात आहे.

मद्रास उच्च न्यायालयाने पोलिस महानिरीक्षक आसरा गर्ग यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक स्थापन करण्याचे आदेश दिले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपापूर्वी, मद्रास उच्च न्यायालयाने आयजीपी आसरा गर्ग यांच्या नेतृत्वाखाली चौकशी सुरू करण्याचे आदेश दिले होते, तर राज्य सरकारने सेवानिवृत्त उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती अरुणा जगदीशन यांच्या मार्फत चौकशी करण्याचे निर्देश दिले होते. चेन्नईच्या करूर येथे झालेल्या या दुर्दैवी चेंगराचेंगरीनंतर तमिळगा वेत्री कळगम (टीव्हीके) पक्षाने आपल्या कार्यकर्त्यांना यावर्षी दिवाळी न साजरी करण्याचे आवाहन केले आहे.