Mumbai crime news – सोने तस्करी प्रकरणी दोन कर्मचाऱ्यांना अटक

विमानतळ कर्मचााऱ्याच्या माध्यमातून होणाऱ्या सोने तस्करीचा डाव महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय) हाणून पाडला. डीआरआयने कारवाई करून दोन कर्मचाऱ्यांना अटक केली. त्यांच्याकडून 1. 6 कोटींचे सोने जप्त केले.

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोने तस्करीचे प्रकार होऊ नये याची खबरदारी घेतली आहे. एक सोने तस्करी करणारे सिंडिकेट हे विमानात लपवून आणि विमानतळ कर्मचाऱ्यांमार्फत सोन्याची तस्करी करत असल्याची माहिती डीआरआयला मिळाली. त्यानंतर डीआरआयच्या पथकाने एका कर्मचाऱ्याला अटक केली.

त्याने ओळख पटू नये म्हणून सोने असलेले पाकीट लपवल्याची कबुली दिली. त्याला ते सोने एका कर्मचाऱ्याने काढून दिले होते. त्या कर्मचाऱ्याच्या चौकशीत आणखी एका कर्मचाऱ्याचे नाव समोर आले. डीआरआयने कारवाई करून 1.6 कोटींचे सोने जप्त केले.