मुंबई विद्यापीठाला हायकोर्टाचा दिलासा, दहा हजाराचा ठोठावलेला दंड रद्द

एका प्रकरणात वेळेत प्रतिज्ञापत्र सादर न केल्याने हायकोर्टाने फैलावर घेत मुंबई विद्यापीठाला दहा हजारांचा दंड ठोठावला. मात्र ही चूक अनवधनाने झाल्याचे मान्य केल्याने हायकोर्टाने ठोठावलेला दहा हजाराचा दंड रद्द केला.

विधी अभ्यासक्रमाचा विद्यार्थी असलेला मितेश वर्षने याने परीक्षा देता न आल्याने हायकोर्टात धाव घेत याचिका दाखल केली. या याचिकेवर न्यायमूर्ती रवींद्र घुगे व न्यायमूर्ती अश्विन भोबे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. न्यायालयाने या याचिके प्रकरणी गेल्या महिन्यात विद्यापीठ प्रशासनाला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले होते. दोन आठवडय़ांत हे प्रतिज्ञापत्र सादर केले जाईल असे विद्यापीठ प्रशासनाने न्यायालयाला सांगितले. मात्र अवधी उलटूनही प्रतिज्ञापत्र सादर न केल्याने तसेच याचिकाकर्त्याला त्याची प्रत न दिल्याने मुंबई उच्च न्यायालयाने विद्यापीठ प्रशासनाला फैलावर घेत दहा हजारांचा दंड ठोठावला.

सुनावणी वेळी मुंबई विद्यापीठाच्या वतीने अॅड. रुई रॉड्रिग्स यांनी युक्तिवाद केला.