
दही जास्त आंबट झाले असेल, तर त्याचा घट्ट चक्का (गोळा) 5 ते 10 सेपंदांसाठी पाण्यात बुडवून लगेच बाहेर काढा. यामुळे आंबटपणा कमी होतो. दह्यामध्ये थोडी साखर मिसळल्यास त्याची चव गोडसर होते. दही लावताना कोमट दुधात काही मनुका टाकल्यानेही आंबटपणा कमी होतो. कारण मनुका नैसर्गिकरीत्या गोडसर असतात.
जर दही खूप आंबट झाले असेल, तर ते टापून न देता कढी, ढोकळा किंवा इडलीच्या पिठात वापरू शकता. आंबट दह्यामध्ये बेसन, चंदन किंवा हळद मिसळून फेसपॅक म्हणून वापरता येते. कारण त्यात मॉइश्चरायझिंग गुणधर्म असतात. जर दह्याला वास येत असेल, रंग असामान्य असेल किंवा बुरशी दिसली असेल, तर ते खराब झाले आहे आणि खाऊ नये. अशा वेळी ते टापून देणे सुरक्षित आहे.